Thursday, 4 August 2016

बारामती बनले शैक्षणिक हब !!

                          बारामती बनले "Educational Hub"

       पुण्यापाठोपाठ बारामती हे एक नवीन शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास आले आहे. शिशु वर्गापासून पदव्युत्तर शिक्षणाची चांगली सोय बारामती मध्ये झाली आहे. बारामती शहरात तब्बल ४० हजाराहून अधिक लोकसंख्या विद्यार्थ्यांची आहे. 


        उत्तम हवामान, निवास व भोजनाची चांगली सोय, वसतिगृहांची उत्तम सुविधा व चांगले शैक्षणिक वातावरण, संगणक व इंटरनेटची उत्तम उपलब्धता, प्रशिक्षित शिक्षक वर्ग, या बाबींमुळे राज्यासह देशाच्याही अनेक भागातून मुले शिक्षणासाठी आता बारामतीमधे येऊ लागली आहेत. 

   
     
            विद्या प्रतिष्ठान, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, शारदानगर शैक्षणिक संकुल, शिवनगर विद्याप्रसारक मंडळ यासारख्या संस्थांसह इतरही काही शैक्षणिक संस्थांकडून शिक्षणाची नवनवीन दलाने उपलब्ध होत आहेत. माजी केंद्रीय कृषिमंत्री मा. शरद पवारसाहेब, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया ताई सुळे, राजेंद्र पवार आदींनी बारामतीत शिक्षणाची चळवळ वाढीस लागावी या हेतूने जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि याचा सकारात्मक परिणाम झाला आहे.


2 comments: