Tuesday 2 August 2016

श्री क्षेत्र कन्हेरी, बारामती

                                        श्री क्षेत्र कन्हेरी


     


समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रीयन तरुणांमध्ये बलोपासनेची आवड निर्माण करण्यासाठी अनेक हनुमान मंदिरे उभारली त्यापैकी कन्हेरीचे मारुती मंदिर आहे असे महटले जाते. हरीभक्त पारायण काळे महाराज यांची ती कर्मभूमी त्यांनी कान्हेरी मारुती मंदिरात अखंड वीणा वादन व "ओम नमो भागवते वासुदेवाय" या मंत्राची सुरवात केली आहे, आजपर्यंत ती परंपरा पुढे चालवली जाते. काळे महाराजांनी कीर्तनकार निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले होते तेथील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी सोनापंत दांडेकर येत असत. काळे महाराजांच्या वास्तव्याने कान्हेरीचे मारुती देवस्थान जागृत आहे. बारामतीच्या पवार कुटुंबाचे ते श्रद्धास्थान असून डॉ.आप्पासाहेब पवार यांनी जन्म गावाचे ऋण फेडण्यासाठी हनुमान देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्राचा विकास झाला आहे. त्याठिकाणी सर्वधर्म ग्रंथालयाची स्थापना देखील ट्रस्ट माध्यमातून करण्यांत आली आहे. 

पंचक्रोशीतील गोर गरीब मुला मुलींचे विवाह कमी खर्चात व्हावेत या करिता ट्रस्टच्या वतीने एक मंगल कार्यालय सुरु करण्यात आले आहे. काळे महाराजांचा अध्यात्मिक वारसा पुढे चालवण्यासाठी अप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कान्हेरी संदेश नावाचे नियतकालिक ह.भ.प सरलाताई बाबर यांच्या संपादनाखाली सुरु करण्यात आले होते. अध्यात्मिक विचाराबरोबर ग्रामीण भागातील नवोदित कवी साहित्यिक यांना प्रोत्साहन देण्याचे कार्यही सुरु होते.




No comments:

Post a Comment